शोधसूत्राने योग्य शब्दाकडे न्यावे. शोधसूत्राला अनुसरून अपेक्षित शब्द अचूक आला पाहिजे.


२१ आणि ३३ चे उत्तर
देतांना  प्रत्येकाने कॉमन सेन्सचा वापर करून उत्तर दिले आहे म्हणून पडाव आणि वागवा खटकले नाहीत. अन्यथा वागवा/ वागंवा आणि पडावं / पडाव हे शब्द एक नाहीत यावर एकमत होईल.  शोधसूत्र पाच ने जसे एकच उत्तर मिळते तसे या शोधसूत्रांचे होत नाही. शोधसूत्राचा दुसरा भाग घेतला तर वागवा आणि पडाव असे शब्द होतात. पण यातील पहिला पर्याय म्हणजे  अनुस्वार असणारे शब्द घेतले तर  त्या अक्षराचा समावेश असणारा  कोड्यातला पुढील शब्द अचूक शोधता येत नाही. अशाच प्रकारे शब्दाकडे नेण्याची क्षमता आणि शोधसूत्रांची अचूकता एकमेकांशी घट्ट बांधलेली आहे.  अनुस्वाराशिवाय  दुसरे उदाहरण घ्यायचे झाले तर शब्दामधले ऱ्हस्व दीर्घ बदलले की वेगळाच शब्द तयार होतो आणि शोधसूत्रे जर जास्त अचूक नसेल तर सोडवणारा भरकटण्याची शक्यता वाढते. म्हणूनच शब्दाकडे नेण्याची क्षमता आणि शोधसूत्राची अचूकता या गोष्टी मी वेगळ्या मानत नाही.

मीराताईंनी त्यांचे मत अचूक शोधसूत्रे असावी असे दिले आहे. मी त्यांच्याशी सहमत आहे.