वर्तमानपत्रे वा मासिके वगैरे ठिकाणी सापडणारी शब्दकोडी आणि मनोगतावरची टिचकीसरशी शब्दकोडी यांच्यात फरक आहे. इतरत्र शब्दकोड्यांमधील शब्द ओळखण्यासाठी शब्दांचे समानार्थी शब्द दिले जातात, वा त्या शब्द वा शब्दसमूहांतून निर्माण होणाऱ्या संकल्पना दुसऱ्या वा वेगळ्या शब्दांमध्ये दिलेल्याअसतात. अशावेळी शोधसूत्रांची अचूकता प्रथम महत्त्वाची आहे. येथील शब्दकोड्यांमध्ये सरळसरळ समानार्थी शब्द न देता जो शब्द ओळखायचा आहे त्या शब्दाची फोड करणे, तो उलट करणे, त्यातली काही अक्षरे घेऊन दुसरे शब्द निर्माण होतात का ते पाहणे आणि असे करून मग त्या फोडीचे, उलट करण्याने निर्माण झालेल्या शब्दाचे वर्णन करणे असे इथले स्वरूप आहे. अशावेळी शोधसूत्रामध्ये "शब्दाकडे नेण्याची क्षमता" असली की सामान्य तर्काने शब्द शोधता येतो. शोधसूत्रे अचूक नसावी अस मी नक्कीच म्हणणार नाही. पण मनोगतावरील शब्दकोड्यांमध्ये प्रथम महत्त्व मी शोधसूत्राच्या शब्दाकडे नेण्याच्या क्षमतेला देईन आणि तेव्हा हे शोधसूत्र अधिकाधिक अचूक कसे होईल हेही पाहीन. असो.