मन्जुशा यांच्या म्हणण्यानुसार खरोखरच बहिणी-बहिणींचे सुद्धा एकमेकांशी पटत नाही. इतकेच नाही तर मैत्रिणी-मैत्रीणींचे सुद्धा पटत नाही. होस्टेलवर रुममध्ये एकत्र राहायचे असो नाहीतर इतर कोठे. दोन स्त्रीयांचे एकमेकांशी (वयाचे बंधन नाही) पटत नाहीच.
मन्जुशा यांच्या म्हणण्यानुसार पैसा हेच बहुतेक या सगळ्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्यचे कारण आहे. सासू ला जर तीच्या तरुणपणी खस्ता खाव्या लागल्या असतील तर सुनेला त्या मानाने चांगले दिवस (अर्थातच पैसा) उपभोगायला मिळत असतील तर सासूला ते सहन होत नाही. ती सूनेचा द्वेष करते. मात्र स्वतःच्या मुलीला छान छान उपभोगायला मिळावे असे तीला वाटते. मुलगी याचा उपयोग करून शक्य तेवढे सासु- सूनेतील संबध बिघडवण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्यात मुलाचा मात्र कोंडमारा होतो. आजकाल कायदे सुद्धा 'मुलापेक्षा' मुलीकडून जास्त झालेत. याचा फायदा घेतला जात आहे.
आई-वडील राहातात मुला कडे आणि सुनेकडे, पण मुला-सूनेचे प्रॉब्लेम समजून न घेता उदो-उदो मात्र मुलीचा आणि जावयाचा करतात. असे जवळपास सगळीकडेच घडते. मुलगा आणि सून यांनी कितीही चांगले केले तरी उपयोग होत नाही आणि याचा फायदा मुलगी घेवून आणखी सासू- सुनेतले संबंध बिघडवते, आणि यात बागबान, अवतार, उमर या सारखे चित्रपट आगीत तेल ओततात.
सून आणि मुलगा म्हणजे वाईट आणि मुलगी म्हणजे अगदी देवी असा समज का आहे?
समजा एका सासू ची मुलगी स्वत : च्या आईवडीलांना सांभाळण्याचा दावा करत असेल तर तीच्या दृष्टीकोनातून ती आणि जावई खुप देवासारखे. बरोबर ? मात्र, त्या मुलीची सासू? तीला हे चालेल का हा त्या मुलीच्या आईने विचार करायला नको? पटतंय का?