अगदी पटले. लहानपणीच ज्या प्रकारे मुला-मुलींना exposure टि.व्ही, इंटरनेट च्या मध्यमातून मिळते आहे, त्याचा विचार करता लैंगिक शिक्षणाकरता पालकांनी आणि सरकारने आग्रही असायलाच हवं.
आपल्या समाजात अजूनही लैंगिक गोष्टींबाबत हा "taboo" आहेच. घरामध्ये मुलांच्या शंकांच निरसन होत नसेल, घरातलं वातावरण खेळीमेळीचे नसेल किंवा कुमारवयातील मुले/मुली व पालक यांमध्ये सुसंवाद नसेल, तेवढ्या मोकळेपणाने या विषयांवर बोलता येत नसेल, तर शंकानिरसनासाठी मुले इतर माध्यमांचा आसरा शोधणारच. आणि मग त्यांना मिळणारी माहिती कशा स्वरूपाची असेल, चूक असेल, बरोबर असेल, यावर आपले काय नियंत्रण असणार? त्यापेक्षा आपणच त्यांना शास्त्रीय माहिती योग्य प्रकारे दिली तर उत्तमच नाही का? भावी पिढीची ही गाडी नेमक्या रुळावरून नेण्यासाठी हा "taboo" थोडा बाजूला ठेवावाच लागेल!
आणि त्यासाठी निदान मला तरी आठवीत असतानाच वय योग्य वाटतं. याच वेळी 'आपण मोठे होतो आहोत' ही जाणीव व्हायला लागलेली असते. त्यांची मानसिकता ओळखून याच वयात मुलांना योग्य दिशा दाखवणे फायद्याचे ठरेल.