आपल्या  कडे लैंगिक शिक्षण म्हणटलं की खूप चुकीचा अर्थ काढला जातो.

लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शारीरिक संबंधान बद्दलची माहिती नाही. लैंगिक शिक्षण म्हणजे वयोमानानुसार शरीरात आणि त्यामुळे होणाऱ्या  मानसिक बदलांची वैज्ञानिक माहिती देणे असा होतो.

किती तरी किशोर वयातील मुलं/मुली शरीरातील होणाऱ्या विचित्र बदलां मुळे शंकित असतात, काही तर हे का होतंय न कळल्या मुळे अवसाद ग्रस्त ही होतात. काही हे बदल समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि कुणाला विचारू न कळल्या मुळे आपल्या समवयीन पण अननुभवी मित्र/मैत्रिणींचा सल्ला घेतात किंव्हा इंटर्नेट, अवैज्ञानिक पुस्तकातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि योग्य माहिती आणि दिशानिर्देशन न मिळाल्याने काही विचित्र कल्पना करून आपण उगीच पाप वगैरे करतोय असा ग्रह करून घेतात.

हे होऊ नये, मुलांना आपल्याच शरीराची भीती वाटू नये ह्या साठी त्यांना योग्य वेळी योग्य सल्ला मिळालाच पाहिजे. आणि हे होण्या साठी योग्य वयात वैज्ञानिक पद्ध्तिने बनवलेल्या अभ्यास क्रमाने त्यांना योग्य माहिती मिळणे  नितांत आवश्यक आहे.