तुमची कविता सुंदरच आहे. सुरवातीपासून संध्याछाया भिवविती हृदया.... असे काहीतरी रूपक असेल असे माझ्या मनाने घेतले होते त्यामुळे कारुण्य दुःख निराशा अशा भावना मनात येऊ लागल्या. मात्र शेवटी ही सांज काही क्षणांचीच पाहुणी आहे हे तुम्ही सांगितल्याने पुनर्जन्म झाल्यासारखे वाटले!
सांजवेळीच अंधारती का दिवे
मालवे सांजवेळीच मनही कसे
कालवे सांजवेळीच प्राणात का
आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे?
ह्या ओळी आवडल्या. विशेषतः तिन्ही ओळीत सांजवेळीच शब्द आल्याने एकामागून एक प्रश्न पडल्याचे ठसते, असे वाटते. (दिवे अंधारती म्हणजे कसे ते कळले नाही.)
आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे ... ह्यात काही अपुरे आहे का? ... आठवांनी कुणाच्या घडावे असे? ... असे काहीसे केले तर अधिक सुबोध होईल काय?
मंदारमालेच्या आधी एक लघ्वक्षर लावून सुमंदारमाला झाली. नंतर सुमंदारमालेच्याही आधी एक गुर्वक्षर लावून झालेले हे वृत्त कोणते बरे? (आधी नाव नसेल श्रीसुमंदारमाला असे नाव शोभेल असे वाटते. )