मला वाटले हे कोडे खूप सोपे जाईल सोडवायला. कदाचित काहीतरी गुंतागुंतीचे उत्तर असेल अशा अपेक्षेने वाचक चकले असावेत  

उत्तर असे आहे :

वृषालीने उपकरणाचा भाग कुलुपबंद पेटीतून पाठवलेला आहे.

निखिल वृषालीकडून आलेल्या पेटीला त्याच्याकडे असलेले कुलूप लावेल आणि पेटी वृषालीकडे पाठवेल.

वृषाली मग त्या पेटीचे तिने लावलेले कुलुप काढून घेईल आणि ती परत निखिलकडे पाठवेल.

मग निखिल त्याचे स्वतः  लावलेले कुलुप उघडून त्याचे उपकरण काढून घेईल.

शशांक नाफडे, विसुनाना, अमिबा (प्रयत्न २) ह्या सदस्यांनी पाठवलेली उत्तरे बरोबर आहेत.

सर्व भाग घेणाऱ्या वाचकांना धन्यवाद, विजेत्यांचे अभिनंदन, आणि पुढच्या कोड्यासाठी शुभेच्छा.

-मेन