प्रतिसादांबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.

......................................................................

महेशराव,


१) सांजवेळीच अंधारती का दिवे...

या ओळीचे उत्तर तिच्या पुढची ओळ देते ! मालवे सांजवेळीच मनही कसे... मालवलेल्या मनाला उजळलेले दिवेही अंधारल्यासारखेच वाटतात ! कातरवेळी सारेच कसे धूसर धूसर दिसते, असे सांगण्याचा प्रयत्न...फसला असावा :)

२) आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे...

सांजवेळ ही अशी वेळ आहे की, त्या वेळी आठवणीच आठवणी मनात दाटून येतात. कुणाच्या कुणाच्या (कुणाकुणाच्या) आठवणींनी प्राणात असे कालवल्यासारखे होत आहे, असे म्हणायचे आहे.

३) हे स्रग्विणी वृत्त आहे. लवकर ये या माझ्या कवितेला तुम्ही दिलेल्या प्रतिसादांपासून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या व याच संकेतस्थळावर चर्चा या विभागात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांबाबत थोडेसे...या लेखात या वृत्ताचा सोदाहरण उल्लेख केलेला आहे. :)

४) सुवर्णमयी म्हणतात, ते बरोबरच होय. (राधिका राधिका राधिका राधिका) . मात्र, स्वैरिणीक्रीडन या वृत्ताबाबत आजवर काही वाचनात वा ऐकिवात आलेले नाही.

५) कविवर्य सुरेश भट यांची या वृत्तातील (स्रग्विणी) एक रचना (गायक ः अरुण दाते) या क्षणी आठवते ः

रंग माझा तुला गंध माझा तुला
बोल काही तरी बोल माझ्या फुला

......................................................................

प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. असाच लोभ राहू द्यावा. :)