माझ्या मते अध्यात्म म्हणजे :
( खाली दिलेली व्याख्या पुर्णपणे एक वाक्य होईल अशी वाचावी )
" सर्व सजीव (प्राणी, मानव, कीटक, झाडे वगैरे) यांचा जीवन मृत्यूपर्यंतचा प्रवास -
- आणि -
- आपण विज्ञानाच्या नियमांनी बांधलेल्या विश्वातील ज्ञात-अज्ञात निर्जीव वस्तू (ग्रह-गोल-तारे सहीत सगळे- जे एका विशिष्ट चक्राने अविरत फिरत असतात)
या सगळ्यांच्या निर्मितीमागे कोणतीतरी शक्ती ( सजीव की निर्जीव ) असून त्या शक्तीला आदर देत आपण चांगले कर्म करून मृत्यूसमयी शांत निर्मोही मनाने आयुष्य त्या शक्तीला अर्पण करू शकू, यासाठी मानवाने विचारशक्तीच्या आधारे मानवाच्याच कल्याणासाठी जीवन जगतांनासाठीचे बनवलेले काहीतरी - म्हणजे अध्यात्म !! "
----
देवपूजा, मंत्रशक्ती, ज्योतिष, देव, अध्यात्म, भूत, अतिंद्रीय शक्ती, पुनर्जन्म या गोष्टी अध्यात्मापासून वेगळ्या करता येवू शकत नाहीत असे मला वाटते.