तुम्ही वर लिहिलेला मजकूर अगदी छान सर्व नियम पाळून लिहिलेला दिसत आहे. शोधूनही चूक सापडली नाही.

खरे तर तुम्हाला तुमचे वरील लेखन खालीलप्रमाणे लिहिण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य होते,

===============

'शूद्धलेखनाचे नीयम शुन्य असावेत' हे पूस्तक प्रसीद्ध झाले आहे.

नमस्कार,

'शूद्धलेखनाचे नीयम शुन्य असावेत' हे पूस्तक प्रसीद्ध झाले आहे.

मराठि माणुस हातात लेखणि घ्यायलाच तयार नसतो कारण शूद्धलेखनात चूका होतिल अशि त्याला खात्रि असते !

शूद्धलेखनात चूका का होतात ? नीयम चूकिच्या गृहितांवर आजवर कसे आधारले गेले ? मराठिच्या गरजा कोणत्या ? त्यासाठि मराठित कोणता बदल झाला पाहिजे ? अशा वीवीध गोष्टिंचि चर्चा व त्यावरिल योग्य उपाय यात दीले आहेत.

माहीतिसाठि संपर्क साधा. दूवा क्र. १

आपला,

शूभानन गांगल

=================
(मी फकत ऱ्हस्व दीर्घाचे नियमच झुगारून देऊ शकलो. ... खरेतर इतरही झुगारता आले असते, पण जास्त वेळ लागला असता. )


तरीही तुमचे लेखन शुद्धलेखनाच्या त्या तेरा चौदा नियमांनुसार का दिसत असावे? मला वाटते ह्याची अनेक कारणे असतील.

१. तुम्ही कुठलाही नियम बियम न पाळता लिहीत गेला. शुद्धलेखनाच्या नियमानुसार ते 'आपोआप' नियमाप्रमाणे निघाले, (हे त्या नियमांचे सुदैव असावे.  )

२. तुम्ही सक्ती म्हणून नाही पण आपखुशीने ते शुद्धलेखनाचे १३ की १४ नियम पाळता. (की आणखीही पाळत असावेत) पण सक्तीला तुमचा सक्त विरोध आहे.

३. तुम्ही लहानपणापासून जसे उच्चारत गेलात तसे लिहीत गेलात ... आणि नियम बनवणारेही तुमच्यासारखेच उच्चार करत असल्याने ते आपोआप नियमानुसार योग्य ठरले.

४. कदाचित एकदम इतके 'नियम' डावलून लिहिले तर विरोध जास्त होईल तेव्हा हळू हळू एकेक नियम मोडत जावा अशी काही व्यूहरचना असेल.

५. मला स्वतःला तुमचा मजकूर हाताने लिहिताना नियम मोडणे इतके कठीण जात होते, त्यामुळे हे नियमाचे अंगवळण (की जोखड) झुगारून देणे किती अवघड आहे ते कळले त्यावरूनअसे वाटते, की तुम्हालाही इच्छा असून नियम तोडणे कष्टाचे पडले असावे.

६. तुम्ही जमेल तितके नियम तोडत गेलात, पण मनोगताच्या सिस्टिमने ते स्वीकारले नाहीत किंवा बदलून टाकले.

७. मला न कळलेली इतर कारणे.


नेमके काय कारण असावे?

(संभ्रमित)
प्रदीप