मराठी माणूस हातात लेखणी घ्यायलाच तयार नसतो कारण शुद्धलेखनात चुका होतील अशी त्याला खात्री असते
विविध भारतीय भाषांत लिहिल्या जाणाऱ्या साहित्यचा तौलनिक अभ्यास केल्यावर मराठीत तुलनेने कमी साहित्य आहे, असे तुम्हाला दिसले असावे आणि नंतर अशा 'न' लिहिणाऱ्यांकडून तुम्हाला त्यांच्या कडून न लिहिण्याची कारणे मिळाली असावीत. अशा प्रकारे सर्वेक्षण आणि संख्याशास्त्रीय विष्लेषण ह्याद्वारे वरीलप्रमाणे निष्कर्ष तुम्ही काढला असावा असे वाटते.
इतर भारतीय भाषांच्या शुद्धलेखनाची काय अवस्था/व्यवस्था आहे? हिंदी साहित्यात शुद्धलेखन पाळतात का? (बहुदा हिंदीत असे काही नियम असावेत. मागे वसंतदादा पाटलांनी टीव्हीवर हिंदी मुलाखतीत 'हमने पानी का साठा किया है' असे काहीसे निवेदन केल्यावर. त्यावर काही हिंदी मराठी अभ्यासकांनी मतप्रदर्शन केले होते, त्यावरून हिंदीत असे काही व्याकरण, शुद्धलेखन, किंवा शब्दांच्या योग्यायोग्य्तेचे नियम (निदान तेव्हातरी) असावेत असे वाटते.)
कृपया आपल्या संशोधनाबद्दल अधिक विस्ताराने माहिती दिलीत तर अनेकांना तिचा फायदा होईल; नाहीतर उगाच पुस्तकाची प्रसिद्धी करण्यासाठी चर्चा सुरू केली असे म्हणून नाके मुरडणाऱ्यांना कारण मिळेल, तसे होऊ नये असेही वाटते.