माझ्या वाचनात गफलत झालेली नाही. प्रीति यांच्या लिखाणात 'ब्राह्मणी संस्कृतीने बनवलेले नियम पाळायचे कशासाठी' असे वाक्य आहे तर आपल्या लिखाणात 'बामणी मराठीत पुन्हा लिहून काढावं' असे वाक्य आहे. सदर चर्चा फक्त शुद्ध/अशुद्ध लिखाणाबद्दल चालली असून, लिखाणाचे हे नियम कोणी बनवले हे या ठिकाणी पूर्णतः अप्रस्तुत आहे. तरीही येथे ब्राह्मणांचा उल्लेख झालाच आहे. तेव्हा चर्चेला जातीयवादी वळण लागून ती भविष्यात ब्राह्मण/अब्राह्मण वादावर भरकटू नये या एकाच हेतूने मी वरील सूचना केली.