त्याला शेतकरी स्वतः काहीच जबाबदार नाहीत ? सरकार तरी काय काय करेल ? 

 IT च्या सुवर्णकाळात/जागतिक करणाच्या काळात , मेक्यानिकल /इलेक्ट्रिकलच्या छोट्या कंपन्यांवर  संक्रांत आली, छोटे -छोटे कारखानदार, लाखो कामगार देशोधडीला लागले, त्या साऱ्यांनी काय आत्महत्या केल्या? राखेतून भरारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभे राहीले..! जो जिता वही सिकंदर !

आत्महत्या हे पाप आहे, त्याने प्रश्न सुटणार नाहीत हे न समजण्याइतका भारतीय शेतकरी अडाणी आहे ? तो कदाचीत निरक्षर असेल ही पण सुसंस्कृत नक्कीच आहे. पाप- पुण्याच्या संकल्पना भारतीयांच्या मानसिकते मध्ये  (  in the pathology )फार फार खोलवर आहेत.

आत्महत्येचे मूळ मानसिकतेत आहे , अपयशात नाही! ती सरकारी अनुदानाने बदलणार नाही. नगदी पिके घेऊन अधिकाधिक पैसे मिळवण्याची, झटपट श्रींमंत होण्याची मानसिकता बदलायला हवी.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी फार पूर्वी सांगून ठेवले आहे .....

हाती नाही बळ/ दारी नाही आड // त्याने फुलझाड /लावू नये//