मध्ययुगीन कालखंडात , पाश्चिमात्य देशात जशीजशी वैज्ञानिक प्रगती होऊ लागली तसं- तसा प्रश्नांचा आणि मतमतांचा गलबला वाढत गेला. एका बाजूला व्यावहारिक शोध लागत होते आणि मनुष्य आपली भौतिक प्रगती साधत होता परंतु वैचारिक/ आध्यात्मिक पातळीवर मात्र अंधारच होता.बायबल ची मते,विज्ञान सत्य म्हणून स्वीकारत नव्हते.

त्यातून तीन मूलभूत प्रश्न उत्पन्न झाले -

१. मी नेमका कोण आहे ? कशापासून बनलो आहे ?

२. ही आजूबाजूची सृष्टी नेमकी काय ?  कशापासून बनली आहे?

३. या परस्परांचा नेमका काय संबंध आहे ?

जसे आपल्याला माहीत आहे , सर्वप्रथम ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी या विषयावर आपली मते मांडली. काही म्हणाले हे विश्व पाण्याचे बनले आहे , काही म्हणाले हवेचे तर काही म्हणाले अग्नीचे. काही अन्य म्हणाले या तिन्हीचे मिळून हे विश्व बनले आहे!

काही म्हणाले या विश्वातले सर्व पदार्थ बदलणारे आहे, काहींच्या मते सारे विश्व स्थिर आहे. अन्य काही म्हणाले , काही गोष्टी बदलणाऱ्या आहेत तर काही स्थिर !पायथॅगोरसच्या मते सारे विश्व अंकांचे बनले आहे तर अन्य काही म्हणाले, 'सातत्य' हे विश्वाचे वैशिष्ट्य आहे  आणि 'बदल' हा भास आहे !

अशातच ऑरीस्टॉटलने "पृथ्वी विश्वाचे केंद्र आहे " ही संकल्पना मांडली, ती चर्च् ने स्वीकारली आणि त्याविरुद्ध बोलणाऱ्याचा आवाज बळाने बंद करण्यात आला. पुढील काही शतके यांवर काही चर्चाच झाली नाही. याच काळात "देव स्वर्गात राहतो, आणि त्याचा पृथ्वीवरील घटनांशी संबंध नाही"आणि 'सैतान/ पाप " या संकल्पनांचा समाजमनावर मोठ्या प्रमाणावर पगडा होता.

मात्र, काही बुद्धीवादी मंडली या मतांवर आली की जर देवाचा या जगाशी काही संबंध नाही, तर सैतानाचाही नाही! म्हणजे हे जग एक physical entity आहे आणि मग तसे असेल तर या जगातील अद्भुत (पृथ्वी कोठून आली? सूर्यापासून! तर मग सूर्य कोठून आला? की कुणी बनवला? ज्याने सूर्य निर्माण केला त्याला कोणी निर्माण केले?)गोष्टी विज्ञानाने सिद्ध व्हायलाच हव्यात.

अगदी अलीकडे,  या विचारांवर पुन्हा मंथन झाले , रेना दी कार्ते, गालीलीओ, न्यूटन आदींनी नवे वैज्ञानिक शोध लावले आणि मध्ययुगीन गैरसमजुतीनं तडा गेला. हे झाले दुसऱ्या प्रश्नाचे मंथन!

पश्चिमेत पहिल्या प्रश्नावर फारसे मंथन झाले नाही. कार्ल मार्क्सने " मी म्हणजे शरीर आणि माझ्या शारीरीक गरजा पूर्ण झाल्या की मी सुखी " असे सांगितले तर रेना दी कार्ते च्या मते "मी म्हणजे माझे मन , माझे विचार. मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे"असे मांडले. सॉक्रेटीसच्या मते,  man is rational being, त्याने बुद्धीला / reasoning ला महत्त्व दिले. अशाप्रकारे या ही प्रश्नाचे ठोस उत्तर नव्हते.

भारतीय तत्त्ववेत्त्यांनी ( आणि मुनीवरांनी) मात्र यावर प्रदीर्घ चिंतन केले आणि निःसंदिग्धं शब्दात सांगितले ....

अहं ब्रह्मास्मि!  मीच ब्रह्न आहे! मीच परमात्मा आहे !

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला  सांगितले ....

इंद्रियानी पराण्याहु..... इंद्रियाच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे आत्मा!

मी म्हणजे मन नाही, शरीर नाही, बुद्धी नाही त्याही पलीकडे आत्मा म्हणजे मी! आणि हा आत्मा कसा आहे ? तर निराकार, निरहंकार, अनादी , अनंत आणि सत्-चिदानंद आहे.

आणि मग भारतीय तत्त्ववेत्त्यानि 'सृष्टी'म्हणजे काय याचाही विचार केला, ' 'सृष्टी' नित्यनूतन बदलणारी आहे, जे आज आहे ते काल नव्हते आणि उद्या असणार नाही मात्र या सगळ्याच्या पाठीमागे एकच तत्त्व काम करते आणि ते कधीही बदलत नाही! ते परम तत्त्व म्हणजे परमात्मा! आणि हा परमात्मा कसा आहे ? तर निराकार, निरहंकार, अनादी , अनंत आणि सत-चिदानंद आहे.

आणि मग पुढे जाऊन भगवान म्हणतात, ही सृष्टी त्रिगुणांनी बनलेली आहे , याचा कर्ता करविता मीच आहे!

हे चराचर आघवे/ जिथे प्रकृती आंत साठवे /ते शिणली जेथ विसावे/ते परमगती मी// ज्ञानेश्वरी ९-२७८

आकाशे सर्वत्र वसावे/वायूनें नांवभरी उगी नसावें/पावके दाहावें/ वर्षावे जळें// ज्ञानेश्वरी ९-२८१

पर्वते बैसका न सांडावी/ समुद्री रेखा नोलांडावी/पृथ्वीया भूते वाहावी /ही आज्ञा माझी/ ज्ञानेश्वरी ९-२८२

'आत्मा आणि परमात्मा' एकच असून त्यांना "मायेने" वेगळे केले आहे. ज्ञानी मनुष्यांस हे उमगते, आणि हीच मनुष्य जन्माची इतिकर्तव्यता आहे.

२० व्या शतकाच्या सुरवातीस पाश्चिमात्या शास्त्रज्ञ जवळ जवळ याच मतांशी आले.आईन्स्टाईन ने 'न्यूटेनिअन मोडेल' नाकारले आणि दोन गोष्टी सिद्ध केल्या.

१. या जगात निखळ सत्य असे काहीही नाही. प्रत्येक गोष्ट 'सापेक्ष'आहे.

२.  Time is fourth dimension  कालाचे आकुंचन/ प्रसरण असू शकते. या जगाचे खरे स्वरूप समजण्यासाठी कालाच्या पलीकडे जायला हवे. ''कालातीत'' व्हायला हवे.

आधुनिक वैज्ञानाने  लहानात लहान अणू फोडला... प्रोटॉन . इलेक्ट्रॉन , न्यूट्रॉन... पुढे काय ? विज्ञान म्हणजे प्रयोगाने अथवा गणिताने सिद्ध केलेली गोष्ट! अणूच्या न्यूट्रॉन पेक्षा लहान कणाचे विज्ञानाने वर्णन करता येणे शक्य नव्हते, त्यांपलीकडे सगळे " वर्णनातीत" !

आणि मग असे लक्षात आले की विश्व हे अनेक एकसारख्या , परस्परांना जोडल्या गेलेल्या लहान लहान कणांनी बनलेले आहे!

भारतीयांनी हेच जरा वेगळ्या शब्दात सांगितले.. पिंडी में ब्रह्मांड !

अध्यात्म ( बुवाबाजी नव्हे ! ) आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

(आधारीत)