विटेकर साहेब आपल सर्वप्रथम अभिनंदन!!!
आपण एक पांढरपेशी दांभिकपणाचा नमुनाच सर्वांसमोर ठेवला आहे. आपण किती वरवर विचार करतो आणि निष्कर्शांचे शिक्के मारुन मोकळे होतो, हे पुन्हा एकदा पटल!
> त्याला शेतकरी स्वतः काहीच जबाबदार नाहीत ? सरकार तरी काय काय करेल ?
वा! बरोबर आहे तुमच सरकारपुढे SEZ साठी कायदे करणे, क्रिकेट खेळणे, शिल्पा शेट्टीच्या पाठीमागे उभे राहणे असे महत्त्वाचे मुद्दे असताना, त्यांनी तरी शेतकर्यांकडे लक्ष देउन वेळ वाया घालवुन कस चालेल?
> IT च्या सुवर्णकाळात/जागतिक करणाच्या काळात , मेक्यानिकल /इलेक्ट्रिकलच्या छोट्या कंपन्यांवर संक्रांत आली, छोटे -छोटे कारखानदार, लाखो कामगार देशोधडीला लागले, त्या साऱ्यांनी काय आत्महत्या केल्या? राखेतून भरारी घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभे राहीले..! जो जिता वही सिकंदर !
वा वा !!! शहरातल्या मेक्यानिकल / इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सची गरिब अडाणी शेतकर्यांशी तुलना. आपल्या विचारशक्तीला दादच दिली पाहिजे. हे सरकारला आधीच कळायला हव होत. त्यांनी हे उदाहरण शेतकर्यांना देउन त्यांचा उध्दार केला असता. किती आत्महत्या आपण वाचवु शकलो असतो!
तोंडातुन हे अकलेचे शब्दिक फुगे सोडण्याआधी एक बाप बैल मिळत नाही म्हणुन आपल्या विशीतल्या दोन पोरांना जमीन नांगरायला भर उन्हात औताला जुंपतो त्यावेळी त्याच्या आतड्याला काय पीळ पडला असेल याचा विचार केला? मग फिनिक्स, सिकंदर हे शब्द हवेतच विरुन गेले असते. बाकी हे India Shining वाल्यांना काय कळणार?
> नगदी पिके घेऊन अधिकाधिक पैसे मिळवण्याची, झटपट श्रींमंत होण्याची मानसिकता बदलायला हवी.
हा मात्र अगदी योग्य सल्ला! आम्ही काहीही करुन झटपट श्रीमंत होणार. शहारात जागांचे भाव वाढवणार, शिक्षणाची किंमत वाढवणार. मुलभुत सोयी इतक्या महाग करणार की त्या तुमच्या बापजाद्याच्या अवाक्यात नाही राहिल्या पाहिजे. वर तुम्ही आरक्षण मागायला आला तर तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहणार! पण तुम्ही मात्र झटपट श्रींमंत होण्याची मानसिकता बदला. किती उदात्त विचार!