प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटी वर खरी उतरवू पाहाणारे ते विज्ञान आणि तर्कापलीकडे जावून काही गोष्टी मान्य करणे म्हणजे अध्यात्म. दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू (विटेकरांच्या म्हणण्याप्रमाणे) आणि दोन्ही आपल्याला आवश्यक आहेत, किंबहूना विज्ञान आणि अध्यात्म एकच (विटेकरांच्या म्हणण्याप्रमाणे) हेही खरेच आहे. पण माणूस मात्र या दोन्ही गोष्टी वेगळ्या मानतो आणि एकाच्या मार्गावर गेले म्हणजे दुसरे सोडले पाहिजे असे त्याला वाटते. खरे तर ,दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे.
मूळ लेखात मी म्हटल्याप्रमाणे "माणूस आयुष्यभर या दोघांत गल्लत करतो. एकाच्या (विज्ञानाच्या) मार्गावर गेले म्हणजे दुसरे (अध्यात्म) सोडले पाहिजे असे त्याला वाटते. येथेच चुकते."