जन्मशताब्दी.

कवी इक्बाल याच्या "सारे जहाँसे अच्छा...." या गीताची शताब्दी चालू आहे. एक कवी एका देशाच्या कल्पनेला जन्म देवू शकतो. सुदैवाने आपल्या देशाला बकिंमचद्र, गुरुदेव टागोर आणि इक्बाल सारखे राष्ट्रकवी मिळाले. दुर्दैवाने इक्बाल याची वैचारीक फसगत झाली आणि शेवटी पाकिस्तानाच्या कल्पनेचा जनक म्हणुन किंवा एक खलनायक म्हणुन इतिहास त्याची नोंद ठेवेल.
तरीपण हे गीत सैनिकाच्या वाद्यवृदांकडुन जेंव्हाही वाजवले जाते तेंव्हा मनात रोमांच उभे राहतात हे कोणी नाकारु शकत नाही.