अप्रतिम! इतके दिवस कुठे दडी मारली होती?
......मर गये अच्छे अच्छे' लिहिणारा पार्टनर त्या वेळी फार मोठा तत्त्वज्ञ वगैरे वाटला होता, आज तो पोरकटच नव्हे तर चक्क खुळचट वाटतो ! असो. )
हे एकदम मान्य, एकेकाळी पार्टनर मला पाठ होती, आता हातात धरवत नाही. वाढत्या वयाबरोबर आपली प्रगल्भता वाढायलाच हवी. अपवाद फक्त पु.ल.!
मी तुमच्याइतका जी. ए.चां भक्त नाही, माझा तुमच्याइतका विषयाचा अभ्यासही नाही, पण मला एक गोष्ट नक्की म्हणावी वाटते, जी. ए. 'श्रद्धावंत ' नव्हते. त्यांनी प्रत्येक गोष्टीची चिरफाड केली, जे पटलं नाही त्याला टोकाचा विरोध केला... लोकांच्या भाव-भावनांचा विचार न करता! या अर्थाने त्यांना radical च म्हणायला हवे.श्रद्धा माणसाला तारते. प्रत्येकाला आप-आपली श्रद्धास्थाने हवीतच.
लोकप्रिय साहीत्य गुणपूर्ण नसतेच हे खरे ! ( सन्माननीय अपवाद - पु. ल.)
आणि भारतीयांना एखाद्याला "देवत्व" बहाल केले की मग त्यातून कोणाचीच सुटका नाही. आपले लाडके माणूस त्यांना सर्वार्थाने अनुकरणीय असते. आणि अशा पद्धतीने ज्या चाहत्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांनी फटकारलेच. कदाचित ते अधिक 'अर्थपूर्ण' जगू शकले असते.
आणखी एक मुद्दा- अरभाट ..... वाचताना भृशूंड पक्षी, पिशव्या विठोबा..... आणि त्यानी विचारलेला तो प्रश्न ... ? जाम आवडला होता. आज आयुष्याच्या मध्यात त्याची काही उत्तरे मिळताहेत असे वाटते.. जी. ए. नांही ती मिळाली असतीलच. पण मग त्यांना अशी विषण्णता का आली? अस्तु.
बाकी तुमचा लेख सुरेखच ! फार दिवसांनी भेटलात. असेच भेटत राहा, मजा आली.
- विटेकर