हे सेमी इंग्रजी फक्त विज्ञान आणि गणित या विषयांपुरते असते.  कला आणि वाणिज्यासाठी लागणारे इतिहास, भूगोल, मराठी, संस्कृत, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र असले विषय राज्यभाषेतून असतात.

मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानेच चांगले समजते ही एक भ्रामक कल्पना आहे.  जगातल्या कुठल्याच देशातील प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही.  ज्या भारतात सुमारे २००० भाषा आहेत त्या देशात हे कदापि शक्य नाही.