माझ्यामते शुद्धलेखन आणि व्याकरण हे एकमेकांपासून पूर्णतः स्वतंत्र नाहीत, तर overlapping आहेत; कारण काल/विभक्तीनुसार शब्दांची वेगवेगळी रुपे काय होतात हे व्याकरणच ठरवते. व्याकरणाशिवाय निव्वळ शब्द फारसे उपयोगी होणार नाहीत. भाषेचा अर्थ हा निराळा विषय आहे हे मला मान्य आहे, आणि तुमच्या म्हणण्याचा रोख म्हणूनच, अर्थाचा स्वतंत्रपणे विचार करावा, शुद्धलेखनाबरोबर नाही, असा असावा असे मला वाटते.
पण ही चर्चा केवळ लिखाणातील शुद्धलेखन आणि व्याकरण इतक्याच मर्यादीत विषयावर चाललेली नसून, लिखाणातील 'शुद्ध' भाषेवर चालली आहे, आणि म्हणूनच या चर्चेत, लिखाणाच्या अर्थाचाही समावेश होतो.
समजा मी असे लिहीले, 'काल रात्री रमेशमध्ये त्याचे घर गेले. मग त्याच्यात त्याची खोली गेली, आणि मग त्याच्यावर खुर्ची बसली.'
आता शुद्धलेखन आणि व्याकरणदृष्ट्या हे लिखाण निर्दोष आहे; पण अर्थाच्या दृष्टीने पाहीले तर ?
तेव्हा 'शुद्ध'लिखाण (फक्त शुद्धलेखन नाही) करायचे असेल तर शब्द आणि व्याकरणाबरोबरच तर्कशुद्ध शब्दप्रयोगांचाही वापर केला पाहीजे; शुद्धलेखन आणि व्याकरण आले की झाले, इतक्या मर्यादीत दृष्टीकोनातून लिखाणाकडे पाहू नये असे मला वाटते.