वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते. अगदी पालापाचोळा तुलना करायची तर 'ग्रीन सॅलड डेज' मध्ये व. पु. काळे वाचणे व त्या पुस्तकांच्या प्रेमात वगैरे पडणे आणि नंतर त्यांचे कोणतेही पुस्तक हातातही न धरवणे - अशी जशी अगदी सामान्य वाचकाची उत्क्रांती होते तसे

मलाही वपू वुडहाऊस हे लोक त्या त्या वयात प्रिय होते. पण तुम्ही म्हणता तसे माझे जी एंच्या बाबतीतही झाले. एका वयात जी एंच्या पुस्तकांची एकामागून एक वाचने केली. मित्रांबरोबर चर्चा केल्या. पण आता तसे करावेसे वाटत नाही. तुम्ही म्हणता तशी माझी उत्क्रांती झाली बहुदा  

तुमचे तीन्ही लेख वाचले. तुम्ही फार मन लावून लिहिले आहेत. आणखी पुढचेहीलेख वाचायला आवडतील.