लहान मुलांना विषयाची गोडी निर्माण व्हावी हा नारळीकरांचा मुख्य हेतू असावा. एकदा गोडी निर्माण झाली की पुढे मनुष्य स्वतःच त्यासाठी आटापिटा करायला लागतो.
मातृभाषेतून विषय समजून घेणे सोपे ठरते. आणि अगदी सुरुवातीला इतके क्लिष्ट शब्दप्रयोगही असणार नाहीत. आणखी एक कारण म्हणजे, समजा दुसऱ्या भाषेतून विषय असला अन् मुलाला ते समजून घ्यायला जड जाऊ लागले तर तो त्या भाषेमुळे विषयापासून दूर जाईल. अन् हे पुढे त्याला अभ्यासासाठी मारक ठरेल.