श्री. गांगल,
'शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत' हे पुस्तक छापण्यामागचा आपला हेतू काय आहे?
१. जर आपला हेतू पैसे कमाविण्याचा असेल तर असे 'पुस्तक' वाचून 'ग्राहक वाचकांना' आनंद देणार आहे कां?
२. हेतू मराठी भाषेच्या भल्यासाठी असेल तर...
अ. ) आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी व ते लोकांना मोफत मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी 'पैसे' मोजून आपले विचार लोकांनी ऐकावेत अशी धारणा सध्याच्या 'तेज' जगात करणं कितपत उचित होईल?
ब. ) आपण आपले विचार जे मराठी भाषेचे व्याकरणकार आहेत, ज्यांचा महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी विकास महामंडळ' व इतर मंडळे यांच्याशी जे सलग्न आहेत अशा विद्वानांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे का?
क. ) दिनांक २७ एप्रिल २००८ च्या लोकसत्ता या वर्तमान पत्रात 'अरुण फडके' यांकडून लिखित, '२०१० पासून शुद्धलेखनाचे सोपे नियम?' या नावाने एक लेख प्रसिद्धीस आला. हा लेख तुम्ही वाचला होता का? ह्या लेखात -पुण्यात फेब्रुवारीमध्ये 'मराठीच्या प्रमाण भाषेचे शुद्धलेखन: एक नवविचार' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चेला उपस्थिती असलेल्या व्यक्तींनी आपआपसातच ठरवून 'नवे नियम' तयार करून महाराष्ट्र शासनाची मंजुरी घ्येण्याचा ठरवलेही आहे. असे असताना तुमच्या विचारांना काही महत्त्व तरी उरते का?
३. आपण आपल्याच 'कल्पनाविश्वात' हरवला आहात का?
हे मुद्दे कृपया आपण स्पष्ट करावेत.