एकही नाही कुपोषित मूल येथे
पोटभर मिळतात अध्यादेश आता

हे खूप आवडलं...

पण 'राज्यकर्ते लांडगे वा मेष आता'  हे नीटसं कळलं नाही... राज्यकर्त्यांना लांडगे म्हटलं, पण मग मेष कोण? राज्यकर्ते नक्कीच मेष वाटत नाहीत...

पण आपली गज़ल वाचल्यावर हे मनात आल्यावाचून राहिलं नाही...

गज़ल सजली आजही उत्कृष्ट येथे
जाणवे आम्हांस पुन्हा हेच आता