अतिशय माहितीपूर्ण लेख.
इतके संदर्भ आणि दाखले दिल्याबद्दल तुमची प्रशंसा करावी तितकी थोडी.
मला जी एं बद्दल फार कुतूहल आहे. त्यांच्या साहित्याची तर मी चाहती आहेच पण त्यांच्या गूढतेने भरलेल्या असामान्य व्यक्तिमत्वाची ही मला मोहिनी आहे.
त्यांना स्त्रियांबद्दल एव्हढा द्वेष का होता? त्यांच्या कथांमध्ये स्त्री एकतर सोशिक किंवा कडक शिस्तीची आई असते किंवा मग असहाय्य रमा किंवा कालिंदी असते... मुग्ध प्रेमिका कधीच नाही. प्रेयसी असलीच तर ती प्रतारणा करणारी, अनैतिक चालीची असते. याचे मूळ त्यांच्या पूर्वायुष्यात असू शकेल का या विषयी मला फार उत्कंठा आहे.
असे इतके विषासमान जहरी आयुष्य वाटावे असे काय अनुभव त्यांना आले होते?
अर्थात आपल्याला त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा काहीच अधिकार नाही, विशेषतः जे खासगीपण त्यांनी आयुष्यभर जपले, आणि कटाक्षाने त्याचा उल्लेख टाळला त्यात.... तरीही त्यांचे इतके उत्कट, गहीरे लिखाण समजून घेतांना, त्यांचे चाहते म्हणून आता तरी थोडी कवाडं खुली व्हावीत असे त्यांच्या लिखाणाच्या प्रेमाखातर वाटते.