अनेक बाबीची व्याख्या चर्चेच्या सुरवातीला करणे आवश्यक आहे.
राष्ट्र म्हणजे काय? समृद्धी म्हणजे काय? राष्ट्रभावना म्हणजे काय? इ. इ. (निदान ह्या चर्चेच्या संदर्भापुरते तरी)
कोणत्याही देशातील लोकांची मानसिकता, त्या देशाचे भविष्य ठरवत असते.
आद्योगिक गुणवत्त नियंत्रणाच्या संदर्भात नेहमी एक उदाहरण दिले जाते. कुठल्याही समस्येवर का? हा प्रश्न एकामागोमाग एक सात वेळा विचारावा, म्हणजे समस्येचे मूळ कारण समजण्यास मदत होते.
आता राष्ट्र (म्हणजे जे काही असेल ते) समृद्ध (म्हणजे जसे काही असेल तसे) नाही ही 'समस्या' आहे. (असे निदान गृहित धरू)
का समृद्ध नाही? तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नागरिकांची मानसिकता अयोग्य आहे म्हणून. (हा मी तुमच्या वरील वाक्याचा लावलेला अर्थ आहे. )
तर मानसिकता योग्य का नाही? असा प्रश्न विचारायचा. त्याला उत्तर मिळाले (असे निदान वाटले तरी) तसे का? असे विचारत जायचे.
मात्र वर्तुळकार फिरत नाही ही खात्री करावी लागेल. म्हणजे असमृद्धीचे कारण राष्ट्रभावनेचा अभाव आणि राष्ट्रभावनेच्या अभावाचे कारण असमृद्धी असे होऊ नये!
(गुणान्वेषी)
प्रदीप