ही लेखमाला मनोगतींना आवडली याचे मला समाधान आहे.
सध्या तरी मनोगतावर चित्रे थेट पाठविणे शक्य नाही. त्यामुळे या लेखांत चित्रे घालणे हे प्रशासकांच्या सहाय्याशिवाय आणि सहकार्याशिवाय शक्यच नव्हते आणि पहिल्या लेखाशिवाय इतर सर्व लेखांचे अस्तित्व चित्रांशिवाय शक्य नव्हते! मी पाठवलेल्या चित्रांची प्रशासकांनी सुबक मांडणी केली आहे परंतु एवढेच करून ते थांबले नाहीत तर लेखांची त्या मानाने ढोबळ शीर्षके बदलून त्यांना समर्पक आणि आकर्षक शीर्षके दिली, लेखांची जोडणी केली आणि एकूणच लेखमालेत नेटकेपणा आणि देखणेपणा आणला. त्याबद्दल त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. मी प्रशासकांची ऋणी आहे.
मीरा फाटक