ऍलर्जी हा कल्पना पूर्णपणे भारतीय आहे. रोजच्या जीवनात मराठी माणूस 'वर्ज' आणि 'वावडे' हे शब्द ऍलर्जीसाठी वापरतो. 'अपथ्य' आणि 'कुपथ्य' हे शब्द आयुर्वेदातून आले आहेत. न सोसणारे पदार्थ(उन्ह, थंडी, वारा, मेघगर्जना, पाऊस, ऋतु, शहर-गांव, स्‍नान, प्रवास, रंग, खाद्यपदार्थ किंवा त्याचे तापमान) ह्यांची माणसागणिक किंवा प्रकृतिनिहाय(कफ, वात, पित्त, वय, शारीरिक स्वास्थ्य, इ.इ.) भिन्‍न असू शकतात. ह्याला इंग्रजीत ऍलर्जी म्हणतात. पाश्चात्य वैद्यकशास्त्रात ऍलर्जीची संकल्पना फार उशीरा आली.