एकदम नवीन शैली. कुठेही बाण मारून पाणी काढणारा अर्जुन, तू जगाला आमची आतडी काढून दाखवणार आणि स्वतःचा मात्र गुळगुळीत दाढी केलेला फोटो लावणार. ( हे तर अगदी तंतोतंत... असो), अरे अजून हाफ पण संपली नाही ना राव. (साल्यांच्या प्रायॉरिटीज क्लियर आहेत) हे खासच आवडले.
पण जरा शुद्धीचिकित्सक वापरला तर बरे होईल. उगीचच मधूनमधून चकण्यात चोरवाटाणा यावा, तसे होते...
अवांतरः 'मनोगत वरील लिखाणातले दारु पिण्याचे वाढते उल्लेख' याविषयी कुणाला काही म्हणायचे आहे का?