या नावाचा एक द्विखंडीय संदर्भ ग्रंथ माझे एक शिक्षक प्रा. अनंत जोशी ( सध्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या ग्रंथालय विभागाचे कार्यवाह ) यांनी संकलित केला आहे. त्यात १९८४ पर्यंत किमान एक पुस्तक प्रकाशित असलेल्या लेखकांची पुरेशी माहिती आहे. त्यात पाहता येईल. मात्र या संदर्भ ग्रंथाची डिजिटल आवृत्ती अद्याप नाही.
दुर्दैवाने, मी ज्या महाविद्यालयात ग्रंथपाल आहे, तेथेही हा ग्रंथ नाही. साहित्य परिषदेत गेल्यावर पाहून पुन्हा माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत आपण व अन्य मनोगतीही वरील माहितीच्या आधारे शोध घेऊ शकतील.
अवधूत.