' मिळून साऱ्याजणी' या मासिकाचा पहिला अंक ऑगस्ट १९८९ मध्ये प्रसिध्द झाला. तेव्हापासून, आजपर्यंत एकही अंकाचा खंड पडता, दरमहा हे मासिक नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. ऑगस्ट २००७ मध्ये 'मिळून साऱ्याजणी' १८ वर्षाची वाटचाल पूर्ण करून १९ व्या वर्षात पाऊल टाकत आहे.
मासिकाची उद्दिष्टे
१) स्त्रीपुरूष समतेचा विचार, स्त्री चळवळीच्या परिघाबाहेर असणाऱ्या स्त्रीपुरूषांपर्यत पोचवावा.
२) शहरी आणि ग्रामीण जीवनाला जोडणारा एक पूल उभारावा.
३) मुख्य म्हणजे स्त्रियांना, पत्रकारितेत नसलेला किंवा अपुरा असलेला अवकाश बघता, त्यांच्यासाठी स्वतःची एक जागा, अवकाश निर्माण करावा.
४) स्त्रीचळवळीचं मुखपत्र अशी प्रतिमा न ठेवता, स्त्रियांच्या जळवळीशी अतूट बांधलकी मानणारं सामाजिक मासिक म्हणून 'साऱ्याजणी' प्रकाशित करावं.
मिळून सार्याजणी - कार्यालयाचा पत्ता
४०/१/ब भोंडे कॉलनी,
कर्वे रोड, पुणे ४
फोन : +९१ २० २५४३ ३२०७
ईमेल: saryajani@gmail.com
मुंबई ऑफिस
मंगला भावे
मनीषा पब्लिकेशन्स प्रा लि
३२ / ३४, मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई १
फोन : +९१ २२ ५६३५ ९७४५