प्रथम इतकी झकास अन् गोंधळून टाकणारी प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद. :)
झकास यासाठी की सर्व बाजूंनी इतकी बंदिस्त अशी प्रतिक्रिया प्रथमच बघितली.
गोंधळून टाकणारी यासाठी की प्रश्नांची उत्तरे स्वतः न मांडता दोन्ही बाजुंचे प्रश्न विचारुन मोकळे झालात. :)
अहो पण या विषयावर वर तुमचे मत काय आहे तेही व्यक्त करा की सोबत! हे चांगले आहे की आग लावून द्यायची अन् स्वतः मजा बघत उभे राहायचे. ते काही नाही.. असे अर्धवट सोडू नका विषयाला.
मला स्वतःला जे प्रश्न पडले त्यांचे उत्तर म्हणून मी "ही" समस्या आहे असे मांडले. प्रश्न पडण्यासाठीचा संदर्भ वर दिलेलाच आहे. आधी ही समस्या आहे की नाही यावर तर खल करुयात. ते एकदा निश्चित झाले त्या समस्येचे मूळ शोधूयात. कसे?
येथे राष्ट्र म्हणजे देश असे मी गृहीत धरले आहे.
समृद्धतेचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या परीने लावू शकतो, ती व्याख्या सापेक्ष आहे. पण तरीही येथे मी समृद्धता या शब्दाचा अर्थ देशाच्या सर्वांगीण प्रगतीशी जोडलेला आहे.