मुमुक्षु मी तुमचे विचार वाचले. छानच आहेत ते. पटण्यासारखेच आहेत.

प्रदीप यांच्या प्रतिक्रियेने चक्रावून जावू नका.
ती प्रतिक्रिया एकमेव राहती तर चांगल्या पुढाकारास अकारण खीळ बसती, म्हणूनच मी हा प्रतिसाद लिहीत आहे.

मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही अन् भ्रष्टाचारास प्रोत्साहन देणार नाही. >>
मी स्वतः हे यथाशक्य पाळतोच.
पाळणारे इतर असंख्य लोकही मी पाहिलेले आहेत.
म्हणूनच आपला देश 'पाकिस्तान' झालेला नाही.

निराश होऊ नका. आपल्यासारखे बहुसंख्य आहेत हा आत्मविश्वास बाळगा.