माझा मूळ प्रश्न : एखादा माणुस एक नेहेमीचा रस्ता न पकडता अचानक आतला आवाज ऐकून दुसऱ्या रस्त्याने जातो आणि त्या रस्त्यावरच त्याचा अपघाती मृत्यू झाला, तर एका प्रश्नाचे उत्तर विज्ञान देवू शकत नाही की, त्याच्या मनात अचानक रस्ता बदलायचा विचार का आला? त्याचवेळेस का आला? हे विधीलिखित होते का?

अजून एक उदाहरण : कधी न लॉटरी घेणाऱ्या माणसाला अचानक एखाद्या दिवशी तीव्रतेने वाटते की आज आपण लॉटरी घ्यायला हवी आणि तो घेतोही आणि त्याला नंतर मोठे बक्षीसही लागते.

अशा प्रकारचा 'विचार' मला अभिप्रेत आहे. अचानक येणारा विचार. किंवा इंग्रजीत इंट्यूशन आपण ज्याला म्हणतो.

 ही दोन उदाहरणे झालीत. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ( चैत्रेचैत याच्या स्पष्टीकरणानुसार : पुरुषाच्या मनात स्त्री बद्दल येणारे विचार आणि मी वर मांडलेल्या प्रश्नातील 'विचार' यात फरक आहे.)