निमिषरावांचा प्रश्न कळला... त्यावर उत्तर द्यायच्या आधी त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो.
जर विधिलिखित वगैरे गोष्टी खऱ्या असतील तर ह 'विधिलेखक' असा आपपरभाव (partiality) का दाखवतो.
काहींचे विधिलिखित खूपच सुंदर अक्षरात असते तर काहींचे म्हणजे झुरळाचे पाय. काहींचे बालकवींच्या कवितेसारखे तर काहींचे ग्रेसांच्या काव्यासारखे.
ही नियती वगैरे जी कोणी असते ती असा favouritism का दाखवते?
काही बालके जन्माला येताक्षणीच मृत्यू पावतात तर काही महाभाग (उदाहरणार्थ, काही राजकारणी... नावं न घेणे उत्तम) जख्ख म्हातारे होतात.
त्या बालकांची काय चूक असते?
माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर 'अध्यात्मा'कडे आहे का?

ता. क. : पापपुण्याची चर्चा होणार नाही अशी आशा वाटते, नाहीतर माझा पुढचा प्रश्न 'अथ केन प्रयुक्तोऽयम् पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः?'