या लेखमालेच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे हे लिहिण्यामागचा उद्देश जी. एंच्या लेखनाचा आणि त्या लेखनामागच्या प्रक्रियेचा आढावा घेणे हा आहे. हा काही जी. एंच्या आयुष्याचा पंचनामा नव्हे. जी. एंच्या खाजगी जीवनात डोकावण्याचा आपल्याला अधिकार नाही. तसे करणे गरजेचेही नाही. जी. एंचा चाहता म्हणून यातली काही माहिती मला असली तरी ती जाहीरपणे लिहिणे अप्रस्तुत ठरेल. शेवटी 'रायटिंग, नॉट दी रायटर' या त्यांच्या आग्रहाचा आपण मान ठेवणे इष्ट ठरेल, नाही का?