फालतू प्रश्न !

मुंबईत तरी, रस्त्यांवर प्रथम हक्क भैय्यांचा, गटारावरच्या दाबेली, पावभाजी, डोसा आणि वडापाव विकण्याऱ्यांचा,  त्यानंतर, कुठेही कश्याही उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सींचा, मग रस्त्यांच्या बाजूला नुसताच एक बॉक्स आणि पंक्चर काढायचे सामान घेऊन बसलेल्या गॅरेज वाल्यांचा, त्यानंतर वाटेल तश्या झूरळांसारख्या पळणाऱ्या बाईक्सचा, त्याच्यामागे नकोतितकी घाई असलेल्या बसचा. आडोसा दिसताचा धार मारून घेणाऱ्या भारतीय पुरषांचा, माना खाली घालून गर्दीतून चालणाऱ्या मुलींचा !

असो !

काही दिवसांपूर्वी त्या आसारामाच्या ( लोक ह्याला असाराम बापू अस म्हणतात )  काही धटिंगणांनी असाच एक जूलूस काढून गोरेगाव (ई) चा सगळा रस्ता काही तासांसाठी बंद करून टाकला होता. ५००-६०० धटिंगण ( तोंडात तोंड फाटे पर्यंत मावा कोंबून )  आणि त्यांच्या आया- बायका-मुली-मुल रस्त्यात ऑर्केस्ट्रा आणि बेंजो पर्ट्यांसकट नाचत सुटले होते, दर १० फुटावर  बाँंब फोडणं चालू होतं ! एकही पोलीस आजू बाजूला नव्हता, आपल्या ह्या थिल्लरपणाचा इतरांना त्रास होत असेल ह्याची कसलीही लाज ह्या निर्लज्जांना नव्हती ! हे सर्व पाहूनच आसाराम बापूचा आसाराम झाला आणि शिष्य धटिंगण !

मयुरेश वैद्य.