रावसाहेब,

आताच ४ था भाग दिसला आणि मागचे तीन आणि हा असे सर्व भाग एकदम वाचले.

ही लेखमाला अतिशय दर्जेदार आहे. जी.एं बद्दल आकर्षण असूनसुद्धा त्यांच्या बद्दल आपण पक्षपाताने मत मांडत नाही याचे कौतूक वाटले.

आपण एक एक पैलू घेवून एक एक भाग करत आहात, तो प्रत्येक भाग पुन्हा पुन्हा वाचावा असा आहे. आपल्या व्यासंगाचे खरेच कौतूक वाटते. (व्यासंग हा शब्दप्रयोग 'सस्ता' असला तरी तो मी काळजीपूर्वक वापरतो.)

या मालिकेला 'काळ्या चष्म्याआडचा माणूस' हा आपला जुना लेख प्रस्तावने सारखा शोभेल असे वाटते. तसे असल्यास तो भाग सुद्धा याच मालिकेला जोडावा.

पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

--लिखाळ.

त.टी. : 'सावित्री मुक्यानेच मेली' हे कथेचे नाव आहे की एखाद्या टूथपेस्टची जाहिरात?' .. हे वाचून फार मजा आली :)