अजिनोमोटो विषयी विरोधी माहिती देखील नुकतीच शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे (इथे पहा दुवा क्र. १),  तेव्हा कंपनीच्या स्त्रोताने पुरवलेल्या माहिती विषयी थोडा जपूनच विश्वास टाकावा,  इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ग्लुटामेट नैसर्गिक अन्नपदार्थांबरोबर जेव्हा शरीरात जाते, तेव्हा इतर घटकांच्या सान्निध्यामुळे त्याच्या अपायकारक प्रवृत्तीला आळा बसतो, पण जेव्हा रासायनिक दृष्ट्या शुद्ध एम एस जी पावडर बाहेरून अतिरिक्त घातली जाते, तेव्हा अपायकारक प्रवृत्तीला असणारा विरोध संपल्याने अपाय होण्याची शक्यता वाढते.  अखेर कोणत्याही वस्तू/पदार्थाचा अतिरेक टाळणे श्रेयस्करच!