हाहाहा. विडंबन चांगलेच जमले आहे.
- धन्यवाद.
निगुतीने प्रयत्न केल्यास चांगल्या सुघट गझला आणि कविताही तुम्हाला जमतील, असे वाटते. शुभेच्छा!
- चित्त, या शुभेच्छांबद्दल अत्यंत आभारी आहे. पण हे जरा अवघडच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चांगल्या गझला व / वा कविता लिहिण्यासाठी लागणारे ' गांभीर्य ' परमेश्वराने आम्हाला अमंळ कमीच दिलेले आहे. आणि जे थोडे-बहुत आहे ते बाँब-स्फोट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, म्यानमारमध्ये आलेल्या वादळाने घेतलेले २५०००हून अधिक बळी, चीनमधील भूकंप, आमटी-भाजीत सौ. ने मीठ कमी तर घातले नसेल ना, अशा गोष्टींविषयी विचार करण्यात खर्ची पडते. 'काव्य' या विषयासाठी काही उरतच नाही हो ! आता हेच बघा ना, तुम्ही "सुघट गझला" लिहिलेत आणि वाचताच मनःचक्षुंपुढे स्मरणातील उत्तमोत्तम गझला येण्याऐवजी या उतारवयातही काही सुघटीतकमनीय आकृत्या तरळून गेल्या. उगीच नाही आमच्यासारख्यांचे यथार्थ वर्णन साडे-तीन शतकांपूर्वी समर्थ "टवाळा आवडे विनोद " या केवळ तीन अक्षरांत करून गेले.
दुसरे (उप)कारण हे की आम्ही कवितेतून कोणतीही गोष्ट पोटतिडिकिने मांडूच शकत नाही. किंबहुना कवितेमुळे / काव्यविषयक विचार करून आमच्यापोटात कधी तिडीक येतच नाही, आलीच तर केव्हातरी डोक्यात येते! आमच्या निगरगट्ट पोटात आलीच तर बाहेरचे अति खाऊन तडस येते(यावर उतारा म्हणून पुढे आठ दिवस सौ. ची बोलणी खावी लागतात ) किंवा सहकाऱ्यांच्या पगाराचे आकडे ऐकून शूळ उठतो. म्हणून म्हणतो, क्षमस्व. सुघट गझला आणि कविता जमतील असे वाटत नाही. मियांकी दौड मस्जिद तक, खोडसाळकी विडंबनतक !