हाही भाग फार वाचनीय आहे. विशेषतः समकालीन कथाकार / लेखकांविषयी जी एं ची मतं आपण फार साक्षेपाने दिली आहेत.
दुसऱ्यांची सदैव खिल्ली उडविणे आणि टोमणे मारणे म्हणजे स्वतः श्रेष्ठ असल्याचा डिंडीम वाजविणेच झाले.
हा एक व्यक्तिमत्वातला दोषच म्हणायला हवा.
इतक्या सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख माले बद्दल तुमचे कौतूक करावे तेव्हढे थोडे.
इतके तुटक आणि विचित्र वागूनही लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाने आकर्षित होत ते मूलतः त्यांच्या अभिजात आणि उच्च दर्जाच्या साहित्यकृतींच्या प्रेमापोटीच असावे.