.. अंधश्रद्धा नव्हे!

पुन्हा तर्कवादी म्हणतील की, 'तर्कापलीकडे जावून एखादी श्रद्धा डोळस कशी असणार?' याला माझेकडे उत्तर नाही. कारण प्रत्येक गोष्ट मी तर्काच्या कसोटीवर घासून बघत नाही.

(इंट्यूशन वगैरे वर एक इंग्रजीत पुस्तक आहे : पर्पज ऑफ अवर लाईफ , लेखकाचे नाव आठवले की सांगेन, त्यात इंट्यूशन वर एक मोठे चाप्टर आहे)

जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला, घटनेला तर्क / व्यवहार / विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघणाऱ्यांना कधी अध्यात्म कळणार नाही... आणि खालील तर्कही कळणार नाही:

देवीच्या कोपामूळे रोग होतो असे मानले ती अंधश्रद्धा (अध्यात्म नाही. तसे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे.) आणि 'त्या' शक्तीने एडवर्ड जेन्नर ला लस शोधण्यासाठी दिलेली बुद्धी म्हणजे काहीतरी अध्यात्मीक!