विनायक, भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या मते उणीदुणी असाच शब्द आहे. तो अनेकवचनातच वापरतात. एकवचनातला उणेदुणे कोणी वापरलेला  अजून तरी पाहिला - वाचला - ऐकला नाही.

शक्य आहे. मी एकवचनात ऐकलेला आहे. वापरलेलाही आहे. तुलनेने अनेकवचन जास्त आहे असे दिसते; पण एकवचन नाही असे सांगता येणार नाही.

संपाद असा शब्दही कोणी वापरताना पा -वा - ऐ नाही.

या उठा करा हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ

 ... ह्या ओळीत संपादणे क्रियापद वापरलेले आहे.

बरीच, ओरबाडेन आणि दुसरीकडे हे शब्दही कृत्रिम वाटले.

हे सर्व शब्द आपल्या वापरात आहेत ह्यांत काय कृत्रिम वाटले, ते समजले नाही.

आपण वेळोवेळी अशाच प्रकारे आवर्जून भाग घेऊन अशाच प्रकारे सूचना कराव्या, ही विनंती.

 त्यामुळे पुढील सुधारणेला हातभारच लागतो. धन्यवाद.