तुम्हाला जर काही अध्यात्मिक आणि अध्यात्म असे दिसले तर त्याचा अर्थ असा तर होत नाही ना की तसेच ते असते? जास्तीत जास्त आपण म्हणू शकतो की, तुम्हाला तसेच दिसले. एवढं तरी पटतंय ना?
आपल्या भारतातच असे अनेक साधक होवून गेलेत की जे मी वर वर्णन केल्याप्रमाणे होते. फक्त आपण त्याकाळांत जन्माला आलो नाही.  आजही असे अनेक जण असू शकतील जे असे साधक आहेत. पण खरा साधक या अनुभवांची वाच्यता त्याला तसा अधिकार असल्याशिवाय कधीच करणार नाही. त्यामुळे ते लक्षात येत नाहीत.
मी अध्यात्म म्हणजे काय हे आधी समजून घेण्याची सूचना केली ती यासाठीच.
जेव्हा एखाद्या उत्तराने संपूर्ण समाधान होते, ते उत्तर आपसूकच वैज्ञानिक असते. फक्त प्रत्येकाची समजून घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे जोवर तुमचे तुम्हाला मिळालेल्या उत्तरात समाधान होत नाही, तोवर त्यावर वाद घालणे निरर्थक ठरते. तसे करून तुम्हीच वैज्ञानिक दृष्टिकोनापासून दूर जात नाहीत काय? त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आधी ते समजून घ्या. नंतर हे ठरवू की त्याची तुलना करणे योग्य आहे किंवा नाही.