पोटच्या पोराची ही अवस्था बघून ह्याच्या वडिलांचं पंजाबी खून सळसळून उठलं.

ह्यात खून ह्या शब्दाऐवजी रक्त असा शब्द वापरल्यास जास्त चांगले वाटले असते.

मला भेटलेला पाहिला ट्रक वाला म्हणजे अर्जुन. जुलै महिन्यात एके रात्री प्रचंड पाऊस पडत असताना मी साधारण २ च्या सुमारास ढाब्यावर पोचलो. ढाब्या समोरच्या मोकळ्या जागेत पावसामुळे लहानसं तळं तयार झालं होतं. मी नेहमी प्रमाणे अगदी दरवाज्या पाशी जाऊन बाइक पार्क केली. बाजूच्या रामचंदर पान वाल्याला हात दाखवला. हा पान वाला २४ तास सुरू असतो. सकाळी भाऊ बसतो आणि रात्री हा. त्या दिवशी पाऊस जरा जास्तच जोरात पडत असल्याने ढाब्यावर बरीच गर्दी होती. आत शिरण्या इतकीही जागा नव्हती. लोकं (ट्रक वाले) वाफाळता चहा पीत पीत पाऊस कमी होण्याची वाट बघत होती. आता पर्यंत बऱ्याच वेळा तिथे गेल्याने ढाब्याचा मॅनेजर 'परी' माझ्या चांगला ओळखीचा झाला होता.

ठळक केलेले शब्द जोडून लिहावेत, म्हणजे खटकणार नाहीत. इतरही पुष्कळ आहेत नमुन्यापुरते वर उतरवले आहेत.

बाकी लेखन चांगले वाटल्याने ह्या सुधारणा सुचवाव्याशा वाटल्या.