अमेरिकेत राहात असाल आणि जर जवळपास भारतीय दुकान नसेल, वा भारतीय दुकानांत मिळणारे चुरमुरे काहीवेळा फार महाग असतात, किंवा शिळे झाल्याने वास येणारे व चामट झालेले असू शकतात, अशावेळी राईस क्रिस्पी सिरियल हा चुरमुऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. हे नेहमी कुरकुरीत असतात. त्यांची भेळ मी अनेकदा केली आहे, उत्तम लागते.