समोर काय सादर केले जातय आणि 'आपले' लोक त्यावर कसा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देत आहेत हे मुलाला जसे दिसेल त्याप्रमाणे त्याचे मन घडत असणार असे मला वाटते.

समोर कोणी चुकीचे घाणेरडे लिहीत असेल, बोलत असेल आणि त्याला आपले नातेवाईक मित्र वगैरे जर चुकीचे वाईट न म्हणता बरोबर आणि चांगले म्हणत आहेत असे दिस्त असेल तर ते मूलही तसेच करू लागेल असे मला वाटते.

इकडे 'पेरेंटल गायडन्स' (पीजी) असा दर्जा देतात त्याचा हाच उद्देश असावा. असे कार्यक्रम पालकांनी मुलांबरोबर बसून पाहावे आणि योग्य तो प्रभाव मुलाच्या मनावर पडेल अशी अपेक्षा असावी.

यामुळे पालकांनी विवेकी बनण्याचे महत्त्व वाढलेले आहे.