पु. लं. च्या बिगरी मधल्या ह्या वाक्याची आठवण झाली.

पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे लेखन प्रकाशित होताना शुद्धलेखन,  मुद्रणदोष इत्यादींबद्दल किती आग्रही होते त्याविषयी माहिती घ्यावी आणि तीही येथे द्यावी. (माझ्या कल्पनेप्रमाणे पु. ल. देशपांडे अतिशय काटेकोर होते आणि सुनीताबाई काटेकोर आहेत.) शिवाय पु. ल. देशपांड्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द प्रमाणित भाषेतच आहे, हेही पाहा.

जाता जाता.

प्रमाणित मराठी आणि कोकणी बोली ह्यावरच्या वादात पु ल देशपांड्यांनी किती गांभीर्याने कठोरपणे आणि निग्रहाने प्रमाणित मराठीची बाजू मांडली आहे त्याचीही माहिती मिळवून वाचावी. (ह्यात माझी चूक असेल तर तसेही सांगावे)

नुसते पिसाटासारखे वावा म्हणणारे प्रतिसाद आले तरच ते बरोबर ही भूमिका योग्य नाही. प्रशंसा मिळवण्याची यत्ता तुम्ही आता पास झालेला आहात. आता तुमचे लेखन वरच्या यत्तेत जावे असे वाटते. तुमच्या लेखनातल्या चुका अनवधानाने होत नसून अज्ञानाने होत आहेत असे त्यांच्या संख्यांवरून वाटते. शिवाय लेखन बाकी बरे वाटल्यामुळेच त्या चुका कळकळीने दाखवाव्याशा वाटल्या, हेही त्या जागी लिहिलेले आहे.

अवांतर : ते रोझ ... वगैरे वाक्य शेक्सपियरचे आहे असे वाटते आणि तेही गुलाबाला काय म्हणावे - म्हणू नये ह्यासंबंधी आहे. रोझ हा शब्द कसा लिहावा - लिहू नये या संबंधी नाही. तो शब्द जगभरचे लोक रोझ असाच न चुकता लिहितात आणि चुकले असेल तर दुरुस्त करून लिहितात.