नुसते पिसाटासारखे वावा म्हणणारे प्रतिसाद आले तरच ते बरोबर ही भूमिका योग्य नाही.
ही भूमिका मी कधी घेतली??? (तुमचा रोख कुठे आहे ते कळण्याइतपत मी सुज्ञ आहे. पण तो विषय वेगळा आहे.)
तुमच्या लेखनातल्या चुका अनवधानाने होत नसून अज्ञानाने होत आहेत असे त्यांच्या संख्यांवरून वाटते.
मराठी माध्यमातले शिक्षण आणि माझे आडनाव ह्यांची बेरीज करता ह्या चुका अज्ञानाने होत आहेत हे तुमचे वाक्य मला तरी झेपत नाही. चुका अनवधानाने होत आहेत हे मी सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे.
शिवाय पु. ल. देशपांड्यांनी लिहिलेला प्रत्येक शब्द प्रमाणित भाषेतच आहे, हेही पाहा.
ह्यावर मी काय बोलणार. सोन्या बालणगावकर अथवा अजून कुणाला भेटा, गैरसमज दूर होईल.
अवांतर - ते रोझ ... वगैरे वाक्य शेक्सपियरचे आहे असे वाटते आणि तेही गुलाबाला काय म्हणावे...
बिगरी ते मॅट्रीक ऐकाच राव एकदा तरी.
अजुनच अवांतर - का वेळ घालवतोय आपण उगाच? मी मला वाटलं ते लिहीलं. आणि मला जे वाटलं ते अजुनही बऱ्याच नवीन लेखकांना वाटत असेल म्हणून ते इथे टाकलं. विषय माझ्या बाजूने संपलेला आहे.