आदित्य जोशी,

तुम्हाला जे म्हणायचं आहे ते नेमक्या शब्दात, स्पष्ट वाक्यरचनेत जमलेलं नाही. तुम्हाला फोनेटीक टंकनाचा त्रास होतोय. पण ते सोडून 'मी लहान बाळं आहे' तुम्ही मला 'समजून घ्या, समजून घ्या' असा गळा का काढलाय? लेखनाचं राहू देत, आपली समस्या तरी व्यवस्थित मांडायला आपण शिकायला हवे. लेखात लिहलय एक, मात्र प्रतिसाद देणाऱ्यांना  " नव्याने मराठी लिहिताना खरंच अडचणी येतात. " असं म्हणताय.

विचार मांडण्याची घाई करणं टाळा. आधी कच्चं कागदावर उतरवा, दोन-तीन वेळा फेरतपासणी करा, मग टंकना कडे वळा. ह्या सरावाचा एखाद्याच्या 'आडनावाशी' काहीही संबंध नसतो. आडनावाचा अभिमान बाळगण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. डबक्यातून बाहेर या. मराठी भाषा सर्वांची आहे.

लिहिण्याचा सराव जमत नसेल तर, अंगठा तोंडात घेवून चोखत बसावे.